गोष्ट त्या दोघांची...
Engineering चे तीन वर्षे पूर्ण झाले, आता शेवटच वर्ष म्हणुन मी आणि माझ्या मित्रांनी hostel सोडायचं आणि बाहेर एखादं भाड्याने मस्त घर घेऊन वर्षभर enjoy करायचं ठरवलं. कारण एकदा college संपलं की सगळे आपापल्या life मध्ये busy होऊन जाणार. मग भेटणं तर दूर कधी एखादा फोन call जरी झाला तरी खूप. लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही घर शोधण्यासाठी निघालो. खूप चौकशी केल्यानंतर एकाने सांगितले, ते त्या पुढच्या गल्लीत पावसकर आजोबा राहतात, त्यांच्याकडे भेटून जाईल तुम्हाला घर. पत्ता शोधत शोधत आम्ही पोहोचलो फाटकावर. त्या वर मस्त मराठीत पाटी लावली होती. श्री म. ना. पावसकर आणि सौ सु.म. पावसकर (पावसकर आजी आजोबा) पावसकर आजी-आजोबांची आमची ती पहिलीच भेट. ती भेट आयुष्यभरासाठी एवढं काहीतरी देऊन जाईल असा कधी वाटलच नव्हतं. फाटक उघडून आम्ही आत गेलो, बाजूलाच एक मोगाऱ्याचे झाड होतं. सुगंध असा दरवळत होता जणू अत्तराला ही लाजवेल. फाटकाचा चा आवाज येताच आजोबा दार उघडून बाहेर आले. 'आजोबा आम्हाला घर हवं होतं, भेटेल का?' 'अरे वा! का नाही भेटणार? भेटणार की.' पहिल्या वाक्यातच ...