ती...
सप्टेंबर २०२० NCRB ने एक अहवाल जाहीर केला, अहवालानुसार संपूर्ण भारतामध्ये दर दिवसाला सरासरी ८८ महिलांवर बलात्कार होतो. लज्जास्पद... खरचं आज ही या समाजात स्त्री सुरक्षित नाही याची कबुली देणाराच हा अहवाल. आजही तिचं समजातल स्थान दुय्यमच. मूल आणि चूल यापलीकडे ही तिचं काहीतरी अस्तित्व आहे हे मान्य करायला आजही आम्ही तयार नाही आहोत. तीने अशेच कपडे घातले पाहिजे, संध्याकाळी ७ च्या आतच घरी आलं पाहिजे अशी अनेक बंधने आम्ही तीच्यावर लादतो. आज ही आपल्या समाजात असा एक वर्ग अस्तित्वात आहे की जो स्त्रियांनी रात्री घराबाहेर पडल्यामुळे किंवा त्यांनी छोटे कपडे घातल्यामुळे बलात्कार होतो असे म्हणणारा आणि मानणारा आहे. असा वर्ग आजही अस्तित्वात आहे म्हणल्यावर अशा घटना घडण नवल नाही, पण हाच समाज जेव्हा हॉस्पिटल मधल्या ८ दिवसाच्या मुलीवर बलात्कार होतो तेव्हा मूग गिळून गप्प बसलेला असतो या गोष्टीचा जास्त राग येतो. २०१२ मध्ये दिल्ली येथे घडलेल्या निर्भया प्रकरणानंतर न्यायासाठी सर्व भारत एकवटला. जागोजागी लोकांनी protest केला, candle march काढले. Social media वर तर status चा जणू उतचं आला होता.याच पार्श्वभूमीवर का...