गोष्ट त्या दोघांची...

Engineering चे तीन वर्षे पूर्ण झाले, आता शेवटच वर्ष म्हणुन मी आणि माझ्या मित्रांनी hostel सोडायचं आणि बाहेर एखादं भाड्याने  मस्त घर घेऊन वर्षभर enjoy करायचं ठरवलं. कारण एकदा college संपलं की सगळे आपापल्या life मध्ये busy होऊन जाणार. मग भेटणं तर दूर कधी एखादा फोन call जरी झाला तरी खूप. लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही घर शोधण्यासाठी निघालो. खूप चौकशी केल्यानंतर एकाने सांगितले, ते त्या पुढच्या गल्लीत पावसकर आजोबा राहतात, त्यांच्याकडे भेटून जाईल तुम्हाला घर. पत्ता शोधत शोधत आम्ही पोहोचलो फाटकावर. त्या वर मस्त मराठीत पाटी लावली होती.
श्री म. ना. पावसकर आणि सौ सु.म. पावसकर (पावसकर आजी आजोबा)
          पावसकर आजी-आजोबांची आमची ती पहिलीच भेट. ती भेट आयुष्यभरासाठी एवढं काहीतरी देऊन जाईल असा कधी वाटलच नव्हतं. फाटक उघडून आम्ही आत गेलो, बाजूलाच एक मोगाऱ्याचे झाड होतं. सुगंध असा दरवळत होता जणू अत्तराला ही  लाजवेल. फाटकाचा चा आवाज येताच आजोबा दार उघडून बाहेर आले. 
'आजोबा आम्हाला घर हवं होतं, भेटेल का?'
 'अरे वा! का नाही भेटणार? भेटणार की.'
 पहिल्या वाक्यातच आम्हाला समजलं हा माणूस खूप comedy आहे.
'कुठले रे मुलांनो तुम्ही?'
'आजोबा आम्ही अमुक अमुक Engineering college ला आहे, आता शेवटच्या वर्षाला.' 
'बरं, आणि गाव कोणतं तुमचं?'
'हा खानदेशातला आहे हा विदर्भाचा, हा मुंबईचा आणि मी साताऱ्याचा.'
'अरे वा! भारी आहे की. सगळे वेगवेगळ्या भागातले, मग मैत्री कशी झाली रे तुमची?'
'आजोबा गुण जुळाले की लग्न होतात आणि अवगुण जुळले की मैत्री.'
आमच्यात पण एक comedy पात्र होत.
(सगळीकडे हास्यकल्लोळ...)
तेवढ्यात आवाज ऐकून स्वयंपाक घरा मधून आजी सुद्धा बाहेर आल्या आणि दरवाज्यात उभ्या राहिल्या.
आजोबांनी लगेच आम्हाला घर दाखवले आणि आम्हाला पण घर खूप आवडले.
'Deposite आम्ही घेणार नाही फक्त rent advance मध्ये द्यावा लागेल आणि हो आमच्या इथे मांस, मच्छी, दारू चालणार नाही'
'आजोबा मग बाहेरून करून आल तर चालेल का?'
पुन्हा आमच्या कॉमेडी पात्राने प्रश्न उपस्थित केला. 'चालेल की, मला पण घेऊन येत जा तेव्हा बरोबर.' अपेक्षित असे उत्तर मिळाले.
सगळं final करून दुसऱ्या दिवशी आम्ही घरात हजर. पहिलाच दिवस असल्यामुळं पोरं कुठं खाणावळ शोधणार म्हणुन आजीने आम्हाला सगळ्यांना रात्रीच्या जेवणासाठी घरीच बोलावलं.एवढ्या आपुलकीनं वागणारे घर मालक आम्ही पहिल्यांदाच बघत होतो. 
संध्याकाळी आजीने देवाच्या आरतीला सगळ्यांना बोलवलं. मी पहिलेच कडवा नास्तिक, दगडतला देव मला कधी रूचालाच नाही, पण तरी त्यांचा मान राखण्यासाठी आम्ही सगळे आरतीला गेलो. रात्री पोटभर जेवण झाले, खूप दिवसानंतर घरचं जेवण भेटलं होतं. दुसऱ्या दिवशी पासून daily routine चालू.
          नवीन कापडाची घडी जशी उलघडावी तशीच आमच्या आजी-आजोबा नातवंडांची नाती हळूहळू उलघडत होती. माझ्या जन्माआधीच माझे आजी आजोबा हे जग सोडून गेले होते त्यामुळं आजोबांच्या खांद्यावर बसून गावभर फिरण्याचा आनंद आणि आजीच्या बटव्यातून मिळालेल्या एक रूपयाच्या गोळ्या बिस्किटाची मजा मला कधी अनुभवताच आली नाही. पण ते म्हणतात ना, योग्य वेळ आली की ती गोष्ट तुम्हाला भेटतेच. कदाचित हीच ती वेळ असेल.काही महिन्यातच कळत नकळत आम्हीही त्याच कुटुंबाचा एक भाग बनून गेलो.आजी-आजोबांना दोन मुले. एक मुंबईत settled तर दुसरा UK मध्ये. वर्षातून क्वचितच एखाद्या वेळी भेट. त्यामुळे आजी आजोबा सुद्धा आमच्यातच नातवंडांचा शोध घेत होते. आमच्या मुळे ते पण खुश होते.देवाच्या आरती बरोबरच रोज नित्यनियमाने घडणारी अजून एक गोष्ट म्हणजे फाटकाजवळील मोगऱ्याच्या झाडाच्या फुलांचा गजरा. आजीला गजरा खूप आवडायचा म्हणून आजोबा रोज स्वतः आजीसाठी गजरा तयार करायचे. आजकालच्या गुलाबाच्या फुलात तेवढ प्रेम कुठे?
          आजीला Tv serials आवडायाच्या आणि आजोबांना cricket match. मग दोघात भांडण चालू झाले की आमच्यातील दोघे आजीची बाजू  घ्यायचे आणि दोघेजण आजोबांची. शेवटी तिथे पण आम्ही जुगाड करून दिला. match मध्ये over झाली किंवा wicket पडली की serial लावायची आणि serial मध्ये advertise लागली की मग match लावायची. मग काय हळूहळू आजी एम एस धोनी ची fan झाली आणि आजोबा serial मधल्या सासूचे. IPL चालू झाले की पुन्हा तेच. तिघेजण MI समर्थक आणि तिघेजण CSK चे कट्टर समर्थक. रात्री जेवण झाल्यावर सगळे गच्चीवर गप्पा मारत बसायचो, आज कॉलेज मध्ये काय काय झालं इथून विषय सुरू व्ह्यायचा आणि हळू हळू त्यांच्या कॉलेज च्या दिवसांना उजाळा मिळायचा. रविवार ची सुट्टी असली की आमचा बेत ठरलेला, मग काय दिवसभर chess आणि carrom. आजी carrom मध्ये expert आणि आजोबा chess master. दोघांच्या आवडी निवडी फारच वेगळ्या, बहुतेक ३६ गुण जुळले नसावे त्यांचे पण मन मात्र जुळली होती.
          आजी-आजोबांचा मित्रपरिवार तसा limited, शेजारच्या बंगल्यातल्या गोखले आजी आणि आमच्या आजी ची चांगली मैत्री. दिवसभर गप्पा मारायला दोघीच. आजोबांना पण ठराविकच मित्र. म्हणून आमच्यातल्या एकाने एके दिवशी आजी-आजोबांना विचारलं तुम्ही वृद्धाश्रमात का नाही गेलात? इकडे तुम्हाला काय झालं तर बघायला पण कोणीच नाही. तिकडे तुमची काळजी घेतली गेली असती आणि नविन ओळखी पण झाल्या असत्या, करमुन गेलं असतं.
'छया् ! त्याची काय गरज आहे, आम्ही आहे की दोघं, एकमेकांची काळजी घ्यायला.' आजोबा म्हणाले.
नात्यात प्रेम असलं की एकमेकांचा कंटाळा येत नाही. हे दोघे जिवंत उदाहरणचं होते जणू त्याचं. किंवा आजकाल सारखं त्यांना personal space वगैर हे काही माहीतच नसावं बहुतेक.
          सगळं काही सुरळीत चाललं होतं. University चे papers सुद्धा चालू  झाले होते आणि अचानक जे घडायला नको होतं ते घडलं. सकाळी अचानक आजोबांच्या छातीत दुखायला लागलं. Already एकदा attack येऊन गेला होता ही दुसरी वेळ होती. लगेच hospitalised करावा लागला. दुपारी सर्वांचा paper होता. आमच्यातला प्रत्येक जण मी थांबतो तुम्ही पेपरला जा असे म्हणत होता. शेवटी अवगुणच जुळलेले ना हो. असं करता करता चौघे पण paper ला गेलोच नाही. आजी ने तर हात पायच गाळले होते. Hospital च़्या counter ला form आणि पैसे भरण्यासाठी सांगितले. आजी ने लगेच गुंडाळी झालेली पैशांची पुरचुंडी पुढे केली, 'बाळांनो घरात आता एवढेच होते बाकीचे ATM मधून काढून आणला का?'
 'आजी तुम्ही Tension घेऊ नका तुम्ही फक्त form वर सही करा बाकी आम्ही बघतो सगळं.'
'बाळांनो, अजून एक काम करा माझ्या मुंबई च्या मुलाला फोन करा.'
सगळी व्यवस्था झाल्यावर आम्ही त्यांच्या मुलाला फोन केला. त्यांनी दिलेले उत्तर अनपेक्षितच नाही तर तळपायाची आग मस्तकाला नेणारं होतं.
' दोन दिवस urgent meetings आहेत, दोन दिवसानंतर येतो.'
बघता बघता तिन्हीसांज झाली doctor त्यांच्या परीने प्रयत्न करत होते. येणारे काही तास खूप critical होते. आज पहिल्यांदाच घरात आरती होणार नव्हती त्यामुळे आजीला चुटपुटा लागला होता. मग देवावर अजिबात विश्वास नसणारा मी आणि माझा एक मित्र आम्ही दोघेच घरी जाऊन आरती करून आलो. आज पहिल्यांदाच आरतीचे ताट मी घेतला होता. का कुणास ठाऊक आज त्या दगडात मी त्या operation करणाऱ्या  doctor  ला बघत होतो. रात्री hospital मध्ये थांबण्यासाठी आजी हट्टच करून बसल्या होत्या, आमचं काही ऐकायलाच तयार नव्हत्या.रात्र वैऱ्याची होती आम्ही सगळे बाहेर बसलो होतो.आजी एकटीच आजोबांबरोबर आत मध्ये होती. आजीने आजोबांचा सुरकुत्या पडलेला हात घट्ट पकडून ठेवला होता. जसं एखादं लहान मूल बोट घट्ट पकडून ठेवत अगदी तसाच. आजोबांच्या डोळ्याच्या कोपऱ्यातून हळूच एक अश्रू ओघळत बाहेर आला. हळूहळू पकड सैल होत गेली आणि आजोबांच्या जीवनाची डोर ही...
          'FOREVER' आपण किती सहजपणे वापरून जातो  ना हा शब्द. पण त्या शब्दाला जागताना आणि जगताना आज मी प्रत्यक्ष डोळ्यांनी बघत होतो. आजोबा गेले. आजीने तिथेच हंबरडा फोडला, काय करावं काही सुचत नव्हतं स्वतःला सांभाळावं की आजीला धीर द्यावा काहीच समजत नव्हता. काळजात असं धस्स झालेलं. भरलेल्या डोळ्यांनी आणि भरलेल्या उराने आम्ही पुन्हा एकदा त्यांच्या मुलाला फोन केला.
'अहो! येतो दोन दिवसात meetings आहेत उद्या परवा सांगितलं ना एकदा'
'Urgent meeting मुळे बापाबरोबर ची शेवटची meeting राहूनच गेली ना ओ काका'.
UK च्या मुलाने तर सरळ कार्यक्रम उरकून घ्या असे सांगितले एवढ्या लांब यायला जमणार नाही. मी नास्तिक होतो देव दगडात नाही माणसात असतो ही मला भेटलेली शिकवण होती.  माणसात तरी देव असतो का? खरचं विचार करायला लावणारी गोष्ट होती. पोरांना मोठं करण्यासाठी ज्या बापानी एवढ्या खस्ता खाल्ल्या तो आज स्मशानभूमीत एकटाच जळत होता, येतील पाखरं पुन्हा निवाऱ्याला याची वाट बघत. 
          आता घर नुसतं खायला उठलं होतं. आता घरात नाही पहिल्यासारखी cricket match चालायची, ना Tv serial ना chess ना carrom. सगळं काही असं भकास भकास वाटत होता. फाटका जवळचं मोगर्‍याचे झाड मात्र एक गोष्ट शिकवत होतं. जरी गजरा झालो तरी सुगंध देत राहणार आणि जरी जमिनीवर पडलो तरी सुद्धा सुगंधच देत राहणार. माणसांना सुद्धा आपले गुणधर्म बदलू नये, जगत राहावं दुसऱ्यांसाठी.
Time heals everything. हळूहळू वेळ सरत गेली आणि घरात आता पुन्हा रोज आरती होऊ लागली. रोज आजी स्वतः गजरा बनवू लागली, हळूहळू स्वतःला सावरू लागली. पण आता यावेळी जाण्याची वेळ आमची होती.कॉलेज संपलं होतं. आजी आता एकटीच राहणार या विचारानं मन सुन्न झालं होतं. ही वेळ कधी ना कधी येणारच होती, पण निरोप घेताना एकट्या आजीचा निरोप घेऊन जाऊ असा कधी वाटलच नव्हतं. अधून मधून भेटायला येत जाऊ असा वचन देऊन जड मनाने आम्ही निरोप घेतला. काय अवस्था झाली असेल त्या बिचारीची, कल्पना केली तरी डोळे भरून येतात. घरट्यातून एक एक पिल्लू बाहेर पडावं आणि परत कधीच न दिसावं, मग त्या माऊलीने तरी कोणासाठी जगावं?.
          हळू हळू वेळ रेती सारखी निसटून चालली होती, एक दिवस आजीला ला फोन केला तर शेजारच्या गोखले आजींनी उचलला, मनात शंकेची पाल चुकचुकली, काहीतरी अजून हातातून निसटून गेलं लगेच जाणीव झाली. आजी पण हे जग सोडून गेली होती. कदाचित तिला तेव्हाच जायचं असेल पण बहुतेक आमच्या मध्ये ती आजोबांबरोबर जगत होती. शेवटची भेट नाही पण त्या घरातला तिचा शेवटचा श्वास तरी अनुभवता यावा म्हणून आम्ही लगेच निघालो.आमची गाडी फाटका वर पोहचली. त्यावरची पाटी अजूनही तशीच होती, ते कोपऱ्यातल मोगऱ्याच्या झाडं ते ही तसाचं. सगळीकडे फुलांचा सडा पडला होता तोच सुगंध दरवळत होता. घर मात्र नव्हतं, दोन्ही मुलं घर विकून पैसे घेऊन गेली होती, तिथे नविन घराचं काम चालू होतं. आमची पण आजी बरोबर शेवटची meeting राहूनच गेली.
          पडलेल्या सड्यातील फुलं ओंजळीत घेऊन निघालो आम्ही अर्धवट निरोप घेऊन. गाडी तर हळू हळू चालली होती पण मनात विचारांचा काहूर माजलेला, विचारांचं चक्र पळत होतं जोरजोरात जणू. ती फाकटावरची पाटी, ते मोगाऱ्याच झाड, गजरा, संध्याकाळ ची आरती, cricket match, Tv serial,  chess, carrom, ती hospital मधली रात्र, ती पैशांची गुंडाळी केलेली पुरचुंडी, सुरकुतलेला हातातील घट्ट हात, डोळ्याच्या कोपऱ्यातून ओघळणारा तो अश्रू, सरणावर चढलेला तो एकटा बाप आणि निरोप घेतानाचा आजीचा कसातरी झालेला तो चेहरा. सगळं काही पळत होतं डोळ्यासमोरून.
          शेवटी माहीत होतं, ती ओंजळीत घेतलेली फुलं पण राहणार नाहीत ना त्यांचा सुगंध, राहणार आहेत त्या फक्त आठवणी.

Comments

  1. Khup sunder lihilay! Majhya aaji ajobanchi athvan zali! Keep it up!

    ReplyDelete
  2. खूपच सुंदर, शेवटी आयुष्य म्हणजे अश्याच भरपूर आठवणी बनवणं!

    ReplyDelete
  3. खूपच सुंदर, शेवटी आयुष्य म्हणजे अश्याच भरपूर आठवणी बनवणं

    ReplyDelete
  4. Great thoughts, great words n overall great message.
    Keep it up.
    Keep Going.

    ReplyDelete
  5. Tears rolled down my eyes while reading... Excellent 👍👍👍

    ReplyDelete
  6. Khup sundar... athvani mhnje ayushy ani ayushy mhnje athvni.. nice message in this story.. keep it up😊👍

    ReplyDelete
  7. मोगरा फुलला... Nice one..

    ReplyDelete
  8. वाचताना तुमचा प्रत्येक शब्द नि शब्द अगदी काळजाला स्पर्श करत होता.. 🙌🙌🙌🙌

    ReplyDelete
  9. लुप्त व्हावं लिखाणात
    व्यक्त व्हावं शब्दांत
    मग्न व्हावं वाचनात
    सुंदर
    अप्रतिम 🙏
    शुभेच्छा

    ReplyDelete
  10. तूच भावा एकदम भारी लिखाण👌👌

    ReplyDelete
  11. Rony.... Speechless....
    Khupppch chaan vyakt zaala aahes....
    रोहन मोठा झालाय, भारी झालाय....
    Keep it up...
    Spread Humanity...!!!!

    ReplyDelete
  12. Very Nice 👌 Heart touching story!🙌🙌

    ReplyDelete
  13. Nice one... I like it... Great effort.

    ReplyDelete
  14. Kiti sahaj sopa lihilas...
    Na konte bojad vyakranache niyam na shabdancha vajandarpana ....itka sahaj ani thet ahe na ki me pavaskar aaji ajobankade pochlele...
    Chan asa bolun eka shabdat nahi sampavnar.....reshmi lihilas...ani ekdm rojchach...
    Mala avadla...hasu,shahare,ashru ani shevti ti gadit tumhi anubhavleli shantata....sagle rang hote ...
    Mogrya sarkhach lihilas....
    स्मृतिगंध 👌🌼

    ReplyDelete
  15. खूप छान writing . वाचून खूप मस्त वाटले पण यातून खूप काही घेण्यासारखे आहे शेवटी आठवणीच राहतात......

    ReplyDelete
  16. सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत, सगळी चलचित्र, सगळी character डोळ्यासमोर हलत होती, विशेष म्हणजे मोगऱ्याचे झाड सुद्धा दिसत होतं डोळ्यासमोर....उत्कृष्ट लेखन, भावनेची जोड, आणि अनुभवाची शिदोरी घेऊन लिहलेला(जगलेला) लेख😘😘😘💥💥💥💥💥💥💥💝💝💝💝💝💯💯

    ReplyDelete
  17. खुपच सुंदर लेख आहे... 👌मनाला हळुवार पणे स्पर्श करून जाणारा, उत्कृष्ट लेखन,भावनेची जोड, आयुष्य म्हणजे काय?...याची सांगड घालणारा लेख.... जन्म आणि मृत्यू यांच्या मधील एक पान, आणि त्या पानावर रेखाटलेले काही क्षण... , आणि त्या अनुभवलेले क्षणांच्या आधारे माणूस पुढील आयुष्य जगत असतो....... खरं आहे म्हणतात ना गेले ते दिवस राहिल्या फक्त..... आठवणी...

    ReplyDelete
  18. हा लेख खरचं खुप भावनिक आहे..
    वाचताना शेवटी डोळ्यात अश्रु आले..
    आणि कुठे तरी वाचलेल्या चार ओळी आठवल्या


    मुल आता मोठी झाली..
    एकदा रस्त्यात चालताना,
    मुलगा बाबा ला म्हणतो,
    बाबा हात धरु नकोस ,
    माझा मी एकटा चालतो..
    माझा मी एकटा चालतो

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पता नहीं

सिग्नल

ती...