ती...

सप्टेंबर २०२० NCRB ने एक अहवाल जाहीर केला, अहवालानुसार संपूर्ण भारतामध्ये दर दिवसाला सरासरी ८८ महिलांवर बलात्कार होतो.
लज्जास्पद... खरचं आज ही या समाजात स्त्री सुरक्षित नाही याची कबुली देणाराच हा अहवाल. आजही तिचं समजातल स्थान दुय्यमच. मूल आणि चूल यापलीकडे ही तिचं काहीतरी अस्तित्व आहे हे मान्य करायला आजही आम्ही तयार नाही आहोत. तीने अशेच कपडे घातले पाहिजे, संध्याकाळी ७ च्या आतच घरी आलं पाहिजे अशी अनेक बंधने आम्ही तीच्यावर लादतो. आज ही आपल्या समाजात असा एक वर्ग अस्तित्वात आहे की जो स्त्रियांनी रात्री घराबाहेर पडल्यामुळे किंवा त्यांनी छोटे कपडे घातल्यामुळे बलात्कार होतो असे म्हणणारा आणि मानणारा आहे. असा वर्ग  आजही अस्तित्वात आहे म्हणल्यावर अशा घटना घडण नवल नाही, पण हाच समाज जेव्हा हॉस्पिटल मधल्या ८ दिवसाच्या मुलीवर बलात्कार होतो तेव्हा मूग गिळून गप्प बसलेला असतो या गोष्टीचा जास्त राग येतो.
२०१२ मध्ये दिल्ली येथे घडलेल्या निर्भया प्रकरणानंतर न्यायासाठी सर्व भारत एकवटला. जागोजागी लोकांनी protest केला, candle march काढले. Social media वर तर status चा जणू उतचं आला होता.याच पार्श्वभूमीवर कायद्यात सुधारणा करून शिक्षा कडक करावी असे प्रतिपादन सर्वच स्तरावरून येऊ लागले. "Delay in justice is injustice" यासारखे slogan viral झाले. सरकारने ही पावले उचलून कायद्यात सुधारणा केल्या पण तरीही या सुधारणा न्याय द्यायला कुठेतरी कमी पडल्या कारण एका निर्भयाला न्याय मिळण्याआधीच २०१९ मध्ये हैद्राबाद येथे दिशा प्रकरण घडले आणि त्यानंतर झालेला तथाकथित एन्काऊंटर पण आपण पहिला. जरी morally योग्य वाटणारा तो एन्काऊंटर मात्र ethically चुकीचाच होता.
निर्भया आणि दिशा प्रकरणातील जखमा अजून कुठे भरतायत तोच अजून एक मनाला सुन्न करणारी बातमी कानावर पडते, हाथरास येथील तरुणीवर सामूहिक बलात्कार आणि त्यानंतर पोलिस प्रशासन आणि सरकार यांचा बेजबाबदारपणा आणि पक्षपातीपणा जगासमोर आला. मग असे काही घडल्यावर तुमच्या आमच्या सारख्या संविधानवादी लोकानासुद्धा एन्काऊंटर सारखा अजून एक गुन्हा योग्य वाटू लागतो.
संविधान श्रेष्ठ आहे असे मानून येथे प्रत्येक व्यक्तीला स्वतःची बाजू मांडण्याची आणि बचाव करण्याची मुभा न्यायालय देते आणि ती दिलीही पाहिजे. पण अशा प्रकरणांमध्े एखादा खाजगी वकील पुढचा व्यक्ती अपराधी आहे हे माहीत असून देखील वकीलपत्र घेतो तेव्हा मात्र तळपायाची आग मस्तकात जाते. शेवटी हा आमच्या प्रोफेशन चा भाग आहे म्हणून सारवासारव केली जाते.पण नैतिकता नावाची गोष्ट उरलीये की नाही थोडीतरी??
काही लोकांकडून अशा प्रकरणामध्ये जाती धर्माचा उल्लेख करून पुन्हा एकदा तिच्यावर बलात्कार केला जातो. विनाकारण यामध्ये जात आणि धर्म आणून समाजामध्ये तेढ निर्माण केला जातो. अशा लोकांपासून पहिले सावध राहिलं पाहिजे कारण ही लोकं पण त्या बलात्कारांच्या एवढीच घातक आहेत. मुळात ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अपराधी हा अपराधीच असतो, अपराध हीच त्याची जात आणि अपराध हाच त्याचा धर्म असतो.
बलात्कार करून नंतर एवढ्या निर्घृणपणे तीची हत्या केली जाते. लहान असताना मुलीला ठेच लागली किंवा साधा चहा जरी भाजला तरी काळजाचं पाणी पाणी होणाऱ्या त्या आईबापाला काय वाटलं असेल जेव्हा त्यांना समजल असेल की आपल्या मुलीला जिवंत जाळण्यात आल आहे. कल्पना केली तरी अंगावर काटा येतो. एक माणूस म्हणून कोण एवढं निर्दयी असू शकतं?? मग आपल्यापेक्षा ती जनावरं बरी नाही का??
हे सर्व का घडतं याचा थोडा विचार केला तरी लगेच लक्षात येईल की समाजातील विकृत मानसिकता हेच या मागचं महत्वाचं कारण आहे. स्त्री ही फक्त उपभोगाची वस्तू म्हणून बघण्याची मानसिकता जो पर्यंत बदलत नाही तो पर्यंत अशा घटना घडतच राहणार. बाकी रात्री घराबाहेर फिरणं, छोटे कपडे घालणं ही तर फक्त विकृत मानसिकता लपावण्यासाठीची पांघरूण आहेत. 
या सगळ्यांवर उपाय काय??
कायद्यात सुधारणा करून फाशीच्या शिक्षेची तरतूद करावी? हो नक्कीच. फाशीच्या शिक्षेची तरतूद ही असलीच पाहिजे. याचा बऱ्याच अंशी फरक पडेल, पण किती प्रमाणात?? काही सांगता येत नाही. त्यामुळे यावर अजून एक उपाय म्हणजे समाजात असलेल्या या विकृत मानसिकतेत बदल करणे. स्त्री ही फक्त एक उपभोगाची वस्तू आहे हा दृष्टीकोन बदलणे.  एकटी मुलगी ही संधी नाही तर जबाबदारी आहे ही शिकवण आपण पुढच्या पिढीला दिली पाहिजे.
आता ही मानसिकता बदलायची कोणाची??
सर्वात प्रथम तर स्वतःची, सुरुवात स्वतःपासून करा हळूहळू समाज पण बदलेल.
"Be the change you want to see in the world."
बाकी protest, candle march आणि social media status हे तेव्हाही होतं आणि आजही बघतोय. फरक फक्त एवढाच तेव्हा एका निर्भयासाठी होतं आणि आज दुसऱ्या.
#justiceforeveryone

"विकृत नराधमांच्या कचाट्यात ती बिचारी एकटीच फसली
शरीराने नाही पण मनाने मात्र ती नक्कीच खचली
असह्य साऱ्या वेदनांना कवटाळून निपचित कोपऱ्यात पडली
तरीही त्या नराधमांची भूक काही नाही भागली
शेवटी तिला जिवंतपणीच जाळली
का तुला तीची थोडी पण दया नाही आली
मुलगी म्हणून ती पुन्हा एकदा हरली
सर्वांनी तिच्यासाठी एक मेणबत्ती सुध्दा पेटवली
पण का आजही तुला तीची व्यथा नाही कळाली"

Comments

  1. भयाण वास्तव मांडलं आहेस, ही मानसिकता खर तर विकृती नेमकी येते कुठून कुटुंबातूनच किंवा आजुबाजूच्या परिस्थिती मधूनच खतपाणी मिळत असेल का ह्या विकृतीला
    ज्या घरामध्ये कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला छत्रपती शिवाजी महाराजांनी जो सन्मान दिला हे शिकवले जाते त्या कुटुंबात ही विकृती जन्मास येत नाही

    ReplyDelete
  2. खूप अभ्यासपूर्ण लिखाण मित्रा🙏

    ReplyDelete
  3. So truee
    Very well written.
    "Be the change you want to see in the world" - This line says it all💯

    ReplyDelete
  4. Very well written sir. Changing ill thinking about women is a slow process.There are provisions, laws, protective measures taken by the government yet none of them can empower women enough as much as we can do for themselves.I intend to be sporty and learn self defence techniques.Women ,being strong and bold, attacking in defense of themselves against brutal men and saving their lives is the best revenge I believe.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पता नहीं

सिग्नल